। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । विना परवाना बेकायदेशीररित्या पत्त्याचा तिरट नावाचा जुगार चालविणार्या जुगार अड्डयावर राहुरी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एक लाख तिन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हि कारवाई मंगळवार दि.23 रोजी दुपारी केली.
या बाबतची माहिती अशी की, वांबोरी येथील उसमाडे वस्तीजवळ काही व्यक्ती तिरट खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन राहुरी पोलिसांनी पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकासह छापा टाकला.
या कारवाईत संतोष नवनाथ कुसमुडे (वय 25, रा.कुसमुडे वस्ती, वांबोरी), राहुल सतिष नन्नवरे (वय 21, रा.राहुरी वेस, वांबोरी), शंकर सुखदेव कात्रज (वय 38, रा.गडाख वस्ती वांबोरी), किरण राजेंद्र कुसमुडे (रा.राहुरी वेस, वांबोरी) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून 1 लाख 3 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. कारवाई दरम्यान, दोघे जण फारार झाले. याप्रकरणी राहरु पोलिसांनी मुंबई जुगार कायद्या कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ.दिपाली काळे,श्रीरामपुर विभागाचे पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे, नितीन चव्हाण, सुनील शिंदे आदींनी केली.