। अहमदनगर । दि. 22 जानेवारी । पुण्याला जाण्याकरिता एसटीबस मध्ये बसण्याकरिता प्रवेश करणार्या प्रवाशी महिलेच्या बॅगमधील 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने अज्ञात चोराने गर्दीचा फायदा घेत चोरुन नेले. हि घटना पुणे बसस्थानक क्र.3 च्या आऊट गेटवर गुरुवारी (दि.21) सकाळी साडे आकरा वाजता घडली.
हौसाबाई तुकाराम गाकयवाड (वय 70, रा.मच्छीमार कॉलनी, बिल्डींग नं.22 बी, रयाजी हॉस्पिटल जवळ, माहिम, मुंबई) या नगरहुन पुण्याकडे जाणार्या एसटीबसमधुन प्रवास करण्यासाठी बसमध्ये प्रवेश करीत असताना खांद्यावरील बॅगची चेन उघडुन
आतील एक लाखरुपये किंतीची तीन तोळे वजनाची सोन्याची माळ, दोन पदरी भरीव मण्याचे नक्षी असलेली दोन तोळे वजनाची सोन्याची चेन असे 5 तोळे वजनाचे दागिने चोरुन नेले.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी हौसाबाई गायकवाड यांच्या फिर्यादीरुन भादंवि कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार ढगे हे करीत आहे.
