। अहमदनगर । दि. 22 जानेवारी । मागील भांडणाचे कारण, तसेच ग्रामसभेत वाळू वाहतूक बंदीचा ठराव मांडल्याच्या रागातून मांजरी येथील शहाजी विटनोर यांना सहा जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तालुक्यातील मांजरी येथे ही घटना घडली.
शहाजी विटनोर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अशोक विटनोर, भागवत होडगर, गोरख होडगर, दादासाहेब ऊर्फ सुभाष विटनोर, सुनील विटनोर यांच्याविरुद्ध जबर मारहाण, तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला.
मारहाण करणारे पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तपास पोलिस उपनिरीक्षक निरज बोकिल करत आहेत.
