रस्त्याच्याकडेला उभे असलेल्या इसमाला धडक ; एकाचा मृत्यू

। अहमदनगर । दि. 22 जानेवारी । भरधाव वेगातील मोटारसायकलने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या इसमाला धडक दिली. या धडकेत गंभर जखमी झालेल्या इसमाला रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

हि घटना पारनेर येथील साखर कारखान्या जवळील बाभुळवाडा येथे घडली. माधव जनार्धन सातपुते (रा.चिंचोली,ता.पारनेर) हे घरी जाण्यासाठी साखर कारखान्याजवळील बाभुळगाव फाटा येथे गाडीची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे होते.

त्यावेळेस भरधाव वेगात आलेल्या मोटार सायकलने सातपुते यांना जोरात धडक दिली. या धडकेत सातपुते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी पारनेर पोलिसांनी सुरेखा सातपुते यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम 304 (अ) 279, 337,338 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे मोटार सायकलस्वार दत्तात्रय विठ्ठल धूरपते (वय 35, रा.जामगाव, ता.पारनेर) यांच्या विरुध्द अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस हवालदार रोकडे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post