महिलेचे मंगळसुत्र पळवले

। अहमदनगर । दि.25 जानेवारी । रस्त्याने पायी जाणार्‍या 51 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 20 हजार रुपय किंमतीचे मंगळसुत्र व 7 ग्रॅम वजनाचे पेडंट बळजबरीने हिसकावून तोडून नेले.

 

हि घटना मार्केटयार्ड मागील कर्पे विटभट्टी परिसरात शनिवारी (दि.23) सकाळी घडली.


शोभा सुमतीलाल बाफना (वय 51, रा.निळकंठ सोसायटी, मार्केटयार्ड मागे) या कर्पे विटभट्टी जवळील रस्त्याने पायी जात असताना अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील 20 हजार रुपयांचे मंगळसुत्र व 7 ग्रॅम पेडन्ट बळजबरीने तोडून चोरुन नेले.

 

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी शोभा बाफना यांच्या फिर्यादीवरुन जबरी चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक भंगाळे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post