राजधानीतील शेतकर्‍यांना पाठींबा ; लाल वादळ मुंबईतील आझाद मैदानात

। मुंबई । दि.25 जानेवारी । राजधानी दिल्लीमधील सीमेवर गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चानं हे आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी विविध संघटना यात सामिल झाल्या आहेत. पायी चालत रविवारी शेतकर्‍यांचे लाल वादळ मुंबईतील आझाद मैदानावर पोहचले आहे.


महाराष्ट्राच्या विविध भागामधून जवळपास 21 जिल्हयामधून 20 हजार शेतकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. या मोर्चामध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक संघटना सहभागी झाल्या आहेत. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित नवले यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचा लाँग मार्च नाशिकवरून सुरू झाला.


शनिवारी संध्याकाळी अखिल भारतीय किसान सभेचा हा लाँग मार्च सुरू झाला. सर्व जण पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाले. घोषणा देत, गाणी म्हणत, ढोल वाजवत आणि हातात लाल बावटा घेऊन शेतकर्‍यांचा हा जत्था रविवारी रात्री उशिरा आझाद मैदानात पोहोचला आहे.

 

 मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी मोर्चा निघाला आहे. आझाद मैदानावर मोर्चा पोहचला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा मोर्चा होणार असल्यामुळे मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. किसान मोर्चावर ड्रोनची नजर असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post