। अहमदनगर । दि. 21 जानेवारी । दुरुस्तीसाठी गॅरेज समोर लावलेल्या पोकलॅड मशीनचे एक लाख 70 हजार रुपये किंमतीचे ब्रेकर तीन ते चार अज्ञात चोरांनी चोरुन नेले हि घटना नगर-औरंगाबाद रोडवरील ओम साई हॉटेल शेजारील फैय्याज भाई गॅरेज येथे रविवारी (दि.17) रोजी रात्री घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी कि, सोपान राधाकिसन शिंदे (वय 61, राहुरी) यांनी नगर - औरंगाबाद रोडवरील हॉटेल ओमसाई शेजारी असलेल्या फैय्याज गॅरेजचे समोर पोकलॅण्ड मशीन दुुरुस्तीकरीता लावलेले असता कोणीतरी अज्ञात चोरानी पोकलॅड मशीनचे फाईन कंपनीचे 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचे ब्रेकर चोरुन गेले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी सोपान शिंदे यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 379, 34 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस नाईक दिपक गांगर्डे हे करीत आहेत.
