शुभांगी साठे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
। अहमदनगर । दि. 21 जानेवारी । दिनदर्शिकेच्या माध्यमातून भिंगार कॅन्टोन्मेंटच्या भाजपा नगरसेविका शुभांगी साठे यांनी आपली विकासकामे जनतेसमोर ठेवले आहे. आपण केलेल्या विकास कामांची माहिती समाजासमोर ठेवल्यामुळे विश्वासार्हता निर्माण होते.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सकारात्मक दृष्टीकोनातून समाजाप्रती आपुलकी निर्माण केली पाहिजे. त्यामुळे समाज नक्कीच आपल्या पाठीमागे उभे राहतो. भाजपा नगरसेविका शुभांगी यांच्या काम नक्कीच लोकांना आवडेल असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, संजय ढोणे, गणेश साठे, उदय कराळे, सभागृह नेता मनोज दुलम, अजय चितळे, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शुभांगी साठे म्हणाल्या की, आपण केलेले काम समाजाला माहित व्हावे, यासाठी दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपली विकासकामे समाजासमोर आणले आहे.
या निमित्ताने समाजातील प्रत्येक घराघरात आपण पोहचू शकतो. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
