9 लाखांच्या दागिन्यांसह 50 हजारांची चोरी

। अहमदनगर । दि.21 जानेवारी । पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे गारगुंडी रस्त्यावरील तुषार ठुबे यांच्या बंगल्याच्या वरच्या मजल्याचे दार उघडून चोरट्यांनी 9 लाख किमतीच्या 180 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह 50 हजारांची रोकड लांबवली.

तुषार यांच्या पत्नी मामेभावाच्या लग्नासाठी राहुरी येथे गेल्या आहेत. घरी तुषार, त्यांची आई व बहीण होती. ग्लास पडल्याचा आवाज झाल्याने आईस जाग आली. उठून पाहिले असता कपाटे उघडी असल्याचे निदर्शनास आले. तुषार यांनी शेजारी विक्रांत ठुबे यांना बोेलावले.

साठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, चाळीस ग्रॅम वजनाचा राणीहार, वीस ग्रॅम वजनाचे नेकलेस, दहा ग्रॅम वजनाचे झुबे, पाच ग्रॅम वजनाची चेन, पंचवीस ग्रॅम वजनाच्या पाच अंगठ्या, तसेच पन्नास हजार रोख लांबवण्यात आल्याचे लक्षात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post