। अहमदनगर । दि.26 जानेवारी । पेट्रोल पंपाजवळ उभा असलेल्या मालट्रक मधुन अज्ञात चोरानी 1 लाख 9 हजार 768 रुपये किंमतीचे कोलगेटचे 34 बॉक्स चोरुन नेले.
हि घटना नगर-दौंड रोडवरील अरणगाव येथील शनिराज हॉटेल समोरील पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (दि.23) रोजी घडली आहे.
अनिल गोविंद देसाई (वय 48, रा.कोल्हापूर) यांनी त्यांचा ट्रक अरणगाव येथील पेट्रोल पंपाजवळ उभा करुन क्लिनरसह ट्रकमध्ये झोपलेले असताना चोराने ट्रकमधुन 1 लाख 9 हजार 768 रुपये किंमतीचे 43 बॉक्स चोरुन नेले आहेत.
याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी अनिल देसाई यांच्या फिर्यादीवरुन भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास सहाय्यक फौजदार पठाण हे करीत आहेत.
