। अहमदनगर । दि.26 जानेवारी : भरधाव वेगातील टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने रस्त्याच्या कडेला असलेल्या फुल विक्रेत्यास धडक दिली. या धडकेत फूलविक्रेता जागीच ठार झाला.
ही घटना नगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर शिवारात जेऊर टोलनाक्या जवळ लेन क्र.2 व साईटपट्टीवर शुक्रवारी (दि.22) रोजी साडेपाचच्या सुमारास घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, नगर-औरंगाबाद रोडने भरधाव वेगात जाणार्या टेम्पोने (क्र.एम.एच.12 आर.एम.1999)
रस्त्याच्या कडेला फूल विक्री करणार्या निलेश मच्छिंद्र मेहेत्रे (वय 29, रा.जेऊर, ता.नगर) यास धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी होऊन निलेश मेहेत्रे याचा जागीच मृत्यू झाला.
