शहरासह जिल्हयात वाहन चोरीच्या घटनेत वाढ

वाहन चोरांनी काढले वर डोके ; 

एका दिवसात अनेक घटनांची नोंद

। अनिकेत पवार । अहमदनगर। : शहरासह तालुक्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, रस्तालुट, फसवणुक, मंगळसुत्र चोरी यासह वाहनचोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. मोटार सायकल चोरांनी पुन्हा डोके वार काढल्याने श्रीगोंदा, कोपरगांव, राहुरी, पारनेर, नगर तालुका पोलिस ठाण्यात एकाच दिवशी सहा गुन्हयाची नोंद झाली आहे.

शहरासह मटक, दारु, जुगार, मादक पदार्थ विक्री या अवैध व्यवसायाची वाढ झाली असुन ईझी मनी मिळविण्याच्या प्रयत्नात युवा वर्ग गुन्हेगारीकडे वळत असुन मोटार सायकल चोरीच्या घटनांची तालुक्यातुनही मालिका सुरु झाली आहे.

श्रीगोंदा येथे वाहन चोरीच्या दोन घटना
श्रीगोंदा तालुक्यात लिपणगाव येथील खंडेराव रतनराव बडवे यांची 1 लाख रुपये किंतीची बुलेट मोटारसायकल क्र (एम.एच16 बी.पी 3190) कोणीतरी अज्ञात चोरानी चोरुन नेली.

दुसर्‍या घटनेत अजनूज येथील गणेश पोपट क्षीरसागर (वय 34 रा.मोरवाडी, अजनूज) यांची घरासमोर लावलेली 70 हजार रुपये किंमतीची सीबी शाईन मोटारसकल अज्ञात चोरानी चोरुन नेली.

या प्रकरणी श्रीगोंदा पोलीसांनी दोन वेगवेगळ्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास श्रीगोंदा पोलिस करीत आहे.

कोपरगाव येथुन बुलेटची चोरी
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथुन 70 हजार रुपये किंमतीची बुलेट मोटारसायकल (क्र. एम.एच.16 बी ई 6501) अज्ञात चोरानी चोरुन नेली. या प्रकरणी कोपरगाव पोलीसांनी बापू जगन्नाथ डांगे (वय 32, रा.जोर्‍हाळे ता.राहता) यांच्या फिर्यादीवरुन भा द वि क 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिप तपास पोलीस नाईक दारकुंडे हे करीत आहे.

राहुरीत मोटार सायकलची चोरी
घराच्या शेडमध्ये लावलेली 10 हजार रुपये किंमतीची डिस्कव्हर मोटार सायकल (क्र. एम.एच.17 ए.एच 5242) अज्ञात चोरानी चोरुन नेली. हि घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे घडली. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी शौकत जाफर शेख (वय 32, रा.गुहा. राहुरी) यांच्या फिर्यादीवरुन चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार गायकवाड करीत आहेत.

मोटारसायकलची चोरी
भाळवणी येथील नंदनवन लॉन येथुन 30 हजार रुपये किंमतीची टिव्हीएस स्टार सायकल (क्र.एम.एच17 सीबी 3796) अज्ञात चोरानी चोरुन नेली. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी भगवानदादा सोमाचंद चोरडिया (वय 49, रा.भाळवणी) यांच्या फिर्यादीवरुन भादविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस हजवालदार उजागरे करीत आहे.

वाळकी येथुन दुचाकीची चोरी
वाळकी येथेील सोनाली मंगलकर्यालय समोर लावेली 25 हजार रुपये किंमतीची होंडा डिलक्स मोटार सायकल (क्र. एमएच 16 बीआर 5822) अज्ञात चोरानी चोरुन नेली. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी हौरसाव निराजी रेपाळे (रा.श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास जमादार लबडे हे करीत आहे.

मोटारसायकलची चोरी
तपोवन रोडवरील संस्कृती मंगल कार्यालयासमोर लावलेली 25 हजार रुपये किंमतीची हिरो डिलक्स मोटार सायकल (क्र.एमएच 20 ई झेड 9386) अज्ञात चोरांनी चोरुन नेली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सचिन बबन ससे यांच्या फिर्यादीवरुन चोरीच्या गुन्हयाची नोंद केली आहे.

नागरीकांनी आपले वाहन पार्किंगमध्ये लॉक करुन ठेवावे. आपल्या वाहनाची रक्षण करावे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post