। अहमदनगर । दि.20 जानेवारी । घरासमोर कचरा टाकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन आई व मुलाला मारहाण करुन वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. 18) रात्री सव्वादहाच्या सुमारास तोफखाना भागात घडली. याप्रकरणी तोफखांना पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सैफ महेमूद शेख आई इर्शादव वडील महेमूद अब्दुलगनी शेख यांच्यासमवेत तोफखाना भागातील हॉटेल पिंगारनजीक राहतात. सोमवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घरासमोर कचरा टाकण्यावरुन फैयाज अब्दुल कादर शेख व त्यांची पत्नी अमरीन फैयाज शेख यांनी सैफ महेमूद शेख, आई इर्शाद व वडील महेमूद शेख यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
वडील महेमूद शेख यांच्यावर चाकूहल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले, असे सैफ महेमूद शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सैफ शेख यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी फैयाज शेख व अमरीन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चालू आहे.
