कोरठण खंडोबाला यात्रेनिमित्त साधेपणाने लावली हळद

। अहमदनगर । दि.20 जानेवारी । लाखो भाविकांचे कुलदैवत श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा (ता. पारनेर, जि. अहमदनगर) या राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रावर पौष षष्टी मुहुतांवर वार्षिक यात्रा माहोत्सवाच्या निमित्त मंगळवारी (दि.19) रोजी सकाळी 10 वा. पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे साधेपणाने फक्त 9 महिलांच्या हस्ते देवाला हळद लावण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

सकाळी 9 वा.ग्रामस्थ नारायण मेहर, संतोष घुले यांनी देवाला मांडव डहाळे आणले. कोरोना निर्बंध लागू असल्याने आणि यात्रा उत्सव रद्द असल्याने 9 महिलांच्या हस्ते साधेपणाने जात्यावर ओव्या गात हळद दळण्यात आली.

देवाला हळद लावण्याचा प्रथम मान सौ.हिराबाई सोनबा वाघमारे या भगिनिंच्या हस्ते प्रथम देवाला हळद लावल्यावर सौ.सुनिता क्षिरसागर, सौ.राणी क्षिरसागर, सौ.सरुबाई वाळूंज, सौ.मंगल मेहेर, सौ.शकुंतला मेहेर, सौ.छाया मेहर, छाया जावध, शोभा चौधरी, नंदा ढोमे, सविता ढोमे, भामा मेहर या भगिनींनी देवाला हळद लावली.

यानंतर श्री व सौ. सुनिल व शैला वाघमारे या मानकर्‍यांच्या हस्ते महाआरती झाली. यावेळी शंकर मेहेर स्वप्निल जगताप (ग्रा.पं.सदस्य), अशुतोष मेहर, देविदास क्षिरसागर, अमोल ढोमे, अलंकार घुले, समाधान पुंडे, अनिकेत क्षिरसागर असे मोजकेच ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post