मनपा प्रभाग 9 मधील निवडणूक प्रक्रिया ; निवडणूक आयोगासह इतरांना नोटीस

। अहमदनगर । दि.20 जानेवारी । मनपाच्या प्रभाग 9 क च्या सदोष निवडणूक प्रक्रियेबाबत औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी राज्य निवडणूक आयोगासह इतरांना नोटीस काढण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते निलेश म्हसे यांनी दिली.

मनपा निवडणूक 2018 मध्ये प्रभाग 9 क ची निवडणूक प्रक्रिया राबवित असताना तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चुकीची निवडणूक छाननी प्रक्रिया राबविली असल्यामुळे सदरची निवडणूक सदोष झालेली असल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

सदर प्रकरणी दि. 18 डिसेंबर 2020 रोजी सुनावणी होऊन खंडपीठाने सर्व प्रतिवादींना नोटीस काढून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी राज्य निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, मनपा व सर्व प्रतिस्पर्धी उमेदवार यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. पुढील सुनावणी दि. 28 जानेवारी रोजी होणार आहे, असे म्हसे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post