हृतिक रोशनची चाहत्यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

। मुंबई ।  जानेवारी । अभिनेता हृतिक रोशनचा दि.10 जानेवारी रोजी वाढदिवस. अनेकदा चाहते आपल्या अभिनेत्याला भेट देतात मात्र, येथे अभिनेत्यानेच वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली. बराच काळ पडद्यापासून हृतिक दूर होता मात्र आता ती प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

हृतिक रोशनच्या आगामी फायटर या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. मार्फ्लिक्स या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. फायटर या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. विशेष म्हणजे हृतिकसोबत प्रथमच अभिनेत्री दीपिका पदुकोण मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

फायटरच्या या निमित्ताने ही जोडी प्रथमच एकत्र येत आहे. सध्या तरी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post