अभिज्ञा भावेच्या हातावर मेहंदी रंगली

। मुंबई । जानेवारी । २०२१ या नवीन वर्षात अभिनेत्री अभिज्ञा भावे हीचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मेहुल आणि अभिज्ञा गेल्या १५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. आता ते लग्नबंधनात अडकणार. नुकताच अभिज्ञाचा मेहंदी आणि ग्रहमखचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे कार्यक्रम तिने अगदी साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडले. तिच्या या सोहळ्यात रेश्मा शिंदे, श्रेया बुगडे, तेजस्विनी पंडित, मयुरी देशमुखसह अनेकांनी हजेरी लावली होती.

Post a Comment

Previous Post Next Post