। अहमदनगर । दि.20 जानेवारी । सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात चालू असलेल्या 60 दिवसांच्या मंडल महापूजा, मकर विलक्कु उत्सवाची सांगता मकर वीलक्कु उत्सवाने झाली. तर 60 दिवस दरवर्षी होणारे रोज विविध कार्यक्रम, महाप्रसाद,भजने हे कार्यक्रम कोविड मुळे न करता फक्त धार्मिक पूजा , दीप आराधना, पुष्पाभिषेकसह कार्यक्रम संपन्न झाले अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष के. के. शेट्टी यांनी दिली
उत्सवानिमित्त दोन महिने सर्व परिसर फुलांनी व दिव्यांनी सुशोभित करण्यात आला होता. मंदिर रोज दिव्यांनी उजळून निघत असत, मंदिराला चारही बाजूने ओवर्या असून मध्यभागी आयप्पा स्वामींचे मंदिर असून एका बाजूला गणपती व दुसर्या बाजूला सरस्वतीचे मंदिर आहे, तीनही मंदिरातील मुर्त्या दिव्यामध्ये प्रसन्न दिसत तर बाहेरील बाजूस स्वतंत्र स्वयंपाक गृह असून महाप्रसादासाठी हॉल आहे. दर शनिवारी व रविवारी मोठ्या संख्येने भाविक येतात .
उत्सावानिम्मित्त 60 दिवस दररोज पूजा पुढील प्रमाणे झाली पहाटे 5 वा पल्लीयुनथरल नंतर निर्मल दर्शन,सकाळी 6व अभिषेक, गणपती होम, स. 7 व प्रसन्नपूजा तर नंतर स.10 वाजेपर्यंत अर्चना,निरांजन व विविध पूजा व नवसासाठी दर्शन झाले. तसेच संध्या साडेपाच ते साडेसहा पर्यंत अलंकार दर्शन,नंतर दीपआराधना,महाआरती रात्री 8 व अथर्वपूजा व नंतर दर्शन,अर्चना,निरांजन होऊन शेवटी हरी वरासम होऊन एक एक दिवा बंद करून अंधार करण्यात येत असत
मकर वीलक्कु उत्सवात पहाटे महागणपती हवन झाले. तर संध्या अय्यप्पा मंदिर परिसरात अशी शोभायात्रा(तालापोल्ली) काढण्यात आली नंतर देवाची आरती व पुष्पभिषेक करण्यात आला, यावेळी भाविकांना प्रसाद देण्यात आले व 60 दिवसांच्या मंडल मकर पूजा उत्सवाची सांगता झाली,दिवसभर हजारो भाविकांनी दर्शन घेतले
