कथ्थक पदविका परीक्षांमध्ये पूर्वजा बोज्जा महाराष्ट्रात प्रथम

। अहमदनगर । दि. 23 जानेवारी । महाराष्ट्रातील शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या कथक पदविका परीक्षेत येथील पूर्वजा बोज्जा हिने विशेष गुणवत्तेसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.

या परीक्षेत महाराष्ट्रातून एकूण १८५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून पूर्वजा बोज्जा हिस मिळालेले यश हे नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात भर घालणारी आहे. 

पूर्वजा ही नगर शहरातील अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या शास्त्रीय नृत्याने मने जिंकली आहेत. ती न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये बायोटेकचे प्रशिक्षण घेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post