। अहमदनगर । दि. 23 जानेवारी । कोपरगाव शहरातील जेऊर, पाटोदा येथे नागरी पेट्रोल पंपासमोर गाडीला धडक दिल्याचा जाब विचारण्यावरून गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास दोन गटात वाद उफाळला. शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी भाऊसाहेब मोतिराम भाबड यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाणीत फिर्यादी भाऊसाहेब भाबड व सलीम पठाण जखमी झाले. सतीश रमेश केकान, संकेत सुनील केकाण, किरण रमेश केकान, संदेश मच्छिंद्र केकाण, सुनील पुंजाजी केकाण, मच्छिंद्र पुंजाजी केकाण, निखिल चंद्रकांत पिंगळे यांच्याविरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल आर. पी. पुंड पुढील तपास करत आहेत.
