अण्णा हजारे यांनी आंदोलन करू नये हीआमची इच्छा : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस अण्णा हजारे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत करणार केंद्रीय मंत्र्यांची चर्चा
। अहमदनगर । दि. 23 जानेवारी । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीपासून येथे आंदोलन करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. त्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली या भेटी दरम्यान विविध विषयावर सुमारे दीड तास चर्चा झाली. मात्र अण्णा हजारे हे 30 जानेवारीच्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे फडणवीसांची शिष्टाई निष्फळ ठरली आहे.
यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन,राधाकृष्ण विखे पाटील शिरूरचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे आदी यावेळी उपस्थित होते
शेतकर्यांच्या प्रश्नासंदर्भात अण्णा हजारे यांनी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला मात्र अण्णा हजारे हे आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. देवेंद्र फडणवीस यांनी सन 2018 मध्ये दिल्ली येथे 2019 रोजी राळेगणसिद्धी येथे हजारे यांच्या आंदोलनामध्ये मध्यस्थी केली होती.
राळेगणसिद्धी येथे तर जवळपास सहा तास मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मनधरणी केली होती. त्यावेळी लेखी आश्वासनावर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र त्याची पूर्तता अद्यापही न झाल्याने अण्णा हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचे रणशिंग पुकारले आहे. फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी अण्णा हजारे यांनी नकार दर्शवला होता मात्र संकट मोचन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्याशी वेळोवेळी संवाद साधत ही भेट घडवून आणली.
अण्णा हजारे यांची मनधरणी करण्यासाठी आलेल्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ही सुरुवात आहे एवढ्या लवकर त्यांची मनधरणी झाली आहे हे बोलणे घाईचे ठरेल मात्र आंदोलन करू नये या मताशी आम्ही सहमत आहोत केंद्र सरकार देखील हाच प्रयत्न करीत आहे.
