। अहमदनगर । दि.10 जानेवारी । निर्यातबंदी उठल्याने कांद्याच्या भावामध्ये वाढ होऊ लागली आहे. शनिवारी दि.9 रोजी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात झालेल्या लिलावात कांद्याला प्रतिक्विंटल 3 हजार 550 रुपये भाव मिळाला.
शनिवारी कांद्याची 45 हजार 694 क्विटल आवक झाली होती. उच्च प्रतीच्या कांद्याला 3 हजार ते 3 हजार 550 रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळाला.
नंबर दोनच्या कांद्याला2 हजार 350 ते 3 हजार रुपये, नंबर तीनच्या कांद्याला 1 हजार 550 ते 2 हजार 350 रुपये, नंबर चारच्या कांद्याला 5 हजार ते 1 हजार 500 रुपये भाव मिळाला.
डिसेंबरमध्ये कांद्याला भाव 2 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत खाली घसरला होता. आता कांद्याच्या दर क्विंटलमागे 1 हजार रुपयाने वाढला आहे. तो पुढील काळात अणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
