। अहमदनगर । दि.11 जानेवारी । येथील सावेडी उपनगरामध्ये रात्रीच्या वेळेस रस्त्याने पायी जाणार्या दोघा मित्रांना अडवू पाच चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून व लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच या चोरट्यानी दोन मोबाईल, 800 रुपये रोख रक्कम असा 17 हजार 800 रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. पाईपलाईन रोडवरील प्रियदर्शनी हॉटेलजवळ ही घटना घडली.
या प्रकरणी गणेश सुजान दास (.वय; 28 रा.वैदूवाडी, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहे.
