। अहमदनगर । दि.12 जानेवारी । अहमदनगर जिल्हा माहिती कार्यालयात असलेली जुनी दैनिक व साप्ताहिके तसेच जुनी प्रकाशने व नियतकालिकांची दरपत्रक मागवून विक्री करावयाची आहे. यासाठी स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर (कार्यालयीन सुटीचे दिवस वगळून) जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर या नावाने आपले दरपत्रक या कार्यालयास दिनांक 19 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत बंद पाकीटातून पाठवावे. पाकीटावर रद्दीसाठीचे दरपत्रक असा स्पष्ट उल्लेख करावा.
या कार्यालयास प्राप्त होणारी दरपत्रके दिनांक 19 जानेवारी, 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता उघडण्यात येतील. दरपत्रक उघडतांना आपण स्वत: अथवा आपला प्रतिनिधी उपस्थित राहू शकतो. दरपत्रके स्वीकारणे अथवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार या कार्यालयाने राखून ठेवला आहे. कार्यालयाचा पत्ता- जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, 1 ला मजला, सावेडीरोड, आकाशवाणी केंद्रासमोर, अहमदनगर.
Tags:
Ahmednagar
