कर्जाला कंटाळून शेतकर्‍यांची आत्महत्या

। अहमदनगर । दि.12 जानेवारी । शेतकर्‍यांच्या समोर कायमच विविध संकट उभे असतात, यामध्ये अवकाळी, दुष्काळ आणि आता कोरोना असे मात्र, यामधून शेतकरी हवालदिल होत चालला आहे. कर्जाचा बोजा वाढत चालल्याने शेतकरी टोकाचा निर्णय घेताना दिसत आहे.

नगर जिल्हयातील श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथील अल्पभूधारक शेतकरी निवृत्ती चंद्रभान बोरुडे (48) यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. 

बोरुडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना चार एकर कोरडवाहू शेती आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी निवृत्ती यांच्यावर होती.

यातुनही मार्ग काढत भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा ते करत होते. सततची नापिकी, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न या चिंतेत ते असत. त्यातून ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे प्रचंड तणावाखाली होते.

नैराश्यातून त्यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले. नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post