। अहमदनगर । दि. 24 जानेवारी । चास ते माळीवाडा बसस्थानक असा प्रवास करताना 25 वर्षीय तरुणीची 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन अज्ञात चोरानी चोरुन नेली. ही घटना शुक्रवारी (दि.22) सोडसात ते अकरावाजण्याच्या सुमारास घडली.
ज्योती सुखदेव करके (वय 25 रा. मढी,ता.पाथर्डी) हि विद्यार्थीनी चास येथुन रायसोनी इंजिनिअरींग कॉलेजहुन माळीवाडा बसस्थानककडे बसने येत असताना अज्ञात चोरानी त्यांची 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन चोरुन नेली आहे.
या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी ज्योती कटके यांच्या फिर्यादीवरुन चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास महिला पोलीस नाईक प्रमिला गायकवाड या करीत आहेत.
