रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने मधूशाली महाविद्यालयास पुस्तकांची भेट


किलज, (दि.13 डिसेंबर) : सध्या सर्वत्र समाजकार्याचा वसा हाती घेऊन शिवविचार हे मनामनात रुजवण्यासाठी काम करीत असलेल्या "रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य" या सेवाभावी संस्थेचे प्रमुख प्रवक्ते. इतिहासाचे युवा अभ्यासक प्रसिद्ध व्याख्याते प्रमोद कारकर यांच्या वाढदिवसानिमित्त रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान अंतर्गत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा टीम यांच्या हस्ते वाढदिवसाच्या निमित्ताने सलगरा (दि) येथील मधूशाली महाविद्यालयात वाचनासाठी उपयुक्त असणारी पुस्तके वाटप करण्यात आली.


शिवविचारावर चालणारे हे प्रतिष्ठान समाजकार्या मध्ये सुद्धा तितक्याच तत्परतेने भाग घेत आहे. या पुस्तके वाटप करण्याच्या उपक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य.स्वामी यांनी आभार मानले. यावेळी प्रा. एम. ए.मुबिन,प्रा. एस. जी. केसकर, प्रा.एस. गिरी,प्रा. एस व्ही.भोसले, प्रा.एस. पारवे सह आदी उपस्थित होते.


त्याचबरोबर प्रतिष्ठानचे उस्मानाबाद जिल्हा सदस्य प्रसाद राजमाने, राम जळकोटे, विशाल केदार, मनोज देवकते, प्रतीक भोसले, वैभव मुळे, अविष्कार फस्के, adv काणिफ काणतोडे, शुभम नलावडे, गणेश काटे,  किरण मोजगे, आकाश घालके सह आदी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post