कोरोना काळात काम करणाऱ्यांचा सन्मान


नगर, (दि.13 डिसेंबर) : भैरवनाथ देवस्थानच्या भंडा-याच्या कार्यक्रमाला यंदा फाटा देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणाऱ्या नगर परिषद,वैद्यकीय,पोलीस, पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिनिधींचा भैरवनाथ मित्र मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. 

 

कोरोनाच्या काळात राहुरी तालुक्यातील वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार,पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच पत्रकारांनी आपले कर्तव्य बजावले आहे.या कामाची दखल घेत नारायण धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ मंदीरात सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी राहुरी नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे,डाॅ संतोष उदावंत,डाॅ. लियाकत सय्यद, पत्रकार मनोज साळवे, महसूल विभागातील संतोष धोंगडे,पोलिस हरिभाऊ पानसंबळ,सागर जंगम आदिंचा सन्मान करण्यात आला.

 

Post a Comment

Previous Post Next Post