नगर, (दि.13 डिसेंबर) : मनपाच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुळानगर पंपिंग स्टेशन येथे मुख्य जलवाहिनीचे काम सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे, अशी माहिती मनपाने दिली. मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे.
तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. दुरुस्तीचे काम सोमवारी (१४ डिसेंबर) सकाळी ११ वाजेपासून सुरू होणार आहे. स्टेशन रोड, विनायकनगर, आगरकर मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी उपनगर भागाला सोमवारऐवजी मंगळवारी (१५ डिसेंबर) पाणी पुरवठा करण्यात येईल.
झेंडीगेट, रामचंद्रखुंट, हातमपुरा, कोठला, माळीवाडा, सारसनगर, बुरूडगाव रोड, सावेडी उपनगर या भागाला बुधवारी, तर सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळेरोड, तोफखाना, नालेगाव, कापडबाजार, आनंदीबाजार, स्टेशनरोड, विनायकनगर भागाला गुरुवारी (१७ डिसेंबर) पाणी पुरवठा करण्यात येईल.
Tags:
Ahmednagar
