मुंबई, (दि.28 डिसेंबर) : पश्चिम रेल्वे मध्ये माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा देखील वापर अनिवार्य करावा अशी मनसेची मागणी आहे.
त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पश्चिम रेल्वेला पत्र पाठवून केली आहे. मागणीचे ट्विट देखील त्यांनी केले आहे.मराठीचा आग्रह धरत अमेझॉन या ई कॉमर्स साईटवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता मनसे पश्चिम रेल्वेकडे वळली आहे.
पश्चिम रेल्वे मध्ये माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा अशी मनसेची मागणी आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, प्रत्येक राज्याप्रमाणे स्थानिक भाषा वापरणं बंधनकारक आहे, मात्र त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात पुरेशी होत नसल्याचं सांगत मनसेने आता पश्चिम रेल्वेला पत्र पाठवलं आहे.
Tags:
Breaking