कॉपर केबल व ट्रान्सफार्मरची चोरी


नगर, (दि.09 डिसेंबर) :  नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवरातून 68 हजार 900 रुपये किंमतीची 346 मी.लांबीची कॉपर केबल, ट्रान्सफार्मर व ट्रान्सफार्मर मधील ऑईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना सोमवारी (दि.7) पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली.


याप्रकरणी सदरील कंपनीचे सिक्युरिटी सुपरवाझर संतोष भिकाजी लंके (वय 42, रा.हंगा, ता.पारनेर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका खासगी संस्थेच्यावतीने महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम घेण्यात आलेले असून सदरचे काम पिंपळगाव कौडा शिवरात सुरु होते.


या कामाच्या ठिकाणी ठेवलेली 68 हजार 900 रुपये किंमतीची कॉपर केबल व ट्रान्सफार्मर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी भा.दं.वि.क.379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post