नगर, (दि.01 डिसेंबर) : शहर व जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पक्ष निरीक्षक स्वाती नेवलेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवनात झाली. यावेळी बूथ कमिट्या, महिला पदाधिकारी, तालुकाध्यक्षांकडून आढावा घेण्यात आला.
स्वागत जि. प. अध्यक्ष राजश्री घुले, महिला जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड व महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांनी केले. यावेळी श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक, निर्मला मालपाणी, मनीषा कोळगे, स्वाती शेणकर, चित्रा बर्डे, अर्चना पानसरे, अलका कोते, रागिणी लांडे, मीनल भिताडे, रजनी निंभोरे उपस्थित होत्या.
चाकणकर पुढे म्हणाल्या की, राजकारणात महिलांनी पुढे येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावपातळीवर महिलांचे संघटन वाढवित असून प्रत्येक गावात महिला अध्यक्ष नेमावेत. तसेच महिलांची बुथस्तरीय रचना बळकट करून शरद पवारांचे विचार सामान्यांपयरत पोहोचवावेत असेही चाकणकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाध्यक्षा मंजुषाताई गुंड म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात चांगले काम आहे. राज्यातील आघाडी सरकारच्या योजना वंचितांपयरत नेण्याचे काम सुरु आहे.
श्रीगोंदे तालुकाध्यक्षपदी मीनल भिंताडे व अकोले शहराध्यक्षपदी भीमा रोकडे यांची निवड करण्यात आली. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहभर सामाजिक उपक्रम घेण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या.
