नाशिक, (दि.08 डिसेंबर) : महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयातील विद्युत भवन येथे आज मंगळवार ०८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्या हस्ते जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक(मासं) महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, औदयोगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, , सहाय्यक महाव्यवस्थापक राजा बोढारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत चव्हाण, व्यवस्थापक सुरेश रोकडे, विधी अधिकारी प्रशांत लहाने, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य व शामकांत आहेर, उपव्यवस्थापक सदू जाधव, किरण बिरारी व सुधा बाजपेयी यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Tags:
Maharashtra
