अठरा डिसेंबर रोजी अहमदनगर विभागाच्या वतीने डाक अदालतीचे आयोजन


नगर, (दि.04 डिसेंबर) :  डाक  सेवेबाबत आपली तक्रार सहा आठवडयांपेक्षा जास्त काळ अनुत्तरीत असल्यास सदर तक्रारींचे निवारण लवकर होण्यासाठी आपण डाक अदालत मध्ये दाद मागू शकता.


त्यासाठी कृपया पुढील गोष्टींची पूर्तता करावी. अनुत्तरीत तक्रारींबाबत अर्ज, त्यासोबत मुळ तक्रारींची प्रत ज्या अधिका-यांकडे दाखल केली त्याचा हुद्दा व दाखल केल्याची तारीख. एका अर्जासोबत एकच तक्रार असावी.


तक्रार जा. तु. भोसले, वरिष्ठ अधिक्षक डाकघर, अहमदनगर विभाग यांचे कार्यालय यांचेकडे दिनांक 14 डिसेंबर 2020 पर्यंत अथवा तत्पूर्वी मिळेल अशा त-हेने दोन प्रतीसह पाठवावी. त्या तारखेनंतर आलेल्या तक्रारींचा डाक अदालतमध्ये समावेश केला जाणार नाही.


विभागीय डाक अदालत अहमदनगर येथे दिनांक 18 डिसेंबर 2020 राजी सकाळी 11 वाजता वरिष्ठ अधिक्षक डाकघर, अहमदनगर विभाग, अहमदनगर यांचे कार्यालयात भरेल, त्यामध्ये सदर व्यक्तीने स्वखर्चाने यावे लागेल त्यासाठी कुठलाही भत्ता दिला जाणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post