कोरठण खंडोबाचा चंपाषष्ठी महोत्सव रद्द


नगर, (दि.05 डिसेंबर) : श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा येथे २० डिसेंबर रोजी होणारा चंपाषष्ठी महोत्सव व सोमवती अमावस्येचे आयोजन रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

 

श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान तीर्थक्षेत्रावर आयोजित केला जाणारा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ११ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत होणारा ३८ कीर्तन सप्ताह आणि सोमवारी (१४ डिसेंबर) सोमवती अमावस्या उत्सवाचे आयोजनही केले जाणार नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post