नगर, (दि.30 डिसेंबर) : माळीवाडा, कौठीची तालिम चौकातील दत्त मंदिरमध्ये श्री दत्तजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेविका मंगलताई लोखंडे, सुलोचना ताठे, प्रांजल लोखंडे, कुसूम रासकर, स्वाती रासकर, सुवर्णा रासकर, प्रतिभा एकाडे, अलका गाडळकर, गायत्री एकाडे, कविता गाडळकर, मीना शिंदे, शितल एकाडे, हर्षली भुमकर, वंदना दरे, बेबी भुमकर, पटवेकर, आदिंसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दत्तात्रेय जन्मोत्सवानिमित्त मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे लघुद्राभिषेक, दुपारी आरती करण्यात येऊन सायंकाळी 7 वाजता भगवान दत्तात्रय यांची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणागीत गाऊन जन्मोत्सव साजरा केला. यावेळी मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई, सुमधूर भक्तीगीतांमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे पौराहित्य मुळे गुरुजी यांनी केले.
याप्रसंगी नगरसेविका मंगलताई लोखंडे म्हणाल्या, दरवर्षी भगवान दत्तात्रेय जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमात परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.