जिल्हा परिषदेमार्फत जनावरांवरील उपचारासाठी काऊ लिफ्टिंग मशिनचे लोकार्पण


नगर, (दि.06 डिसेंबर) :  नगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे. दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने पशुधन सांभाळताना, त्यांचे आरोग्य राखताना शेतकर्‍यांना मेहनत घ्यावी लागते. जनावर एखाद्या आजाराने खाली बसल्यावर त्याच्यावर उपचार करण्यासाठी जनावर उचलणे कठिण होते. अशावेळी काऊ लिफ्टिंग सारखे मशिन मोलाची मदत करणारे आहे. 

 

पशुपालक असलेला शेतकरी हा आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. त्याला मदत करणे हे कर्तव्यच आहे. लोकहिताची जास्तीत जास्त काम शेवटच्या घटकापर्यंत पोहचिवण्याचा जिल्हा परिषदेचा कायम प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा राजश्री घुले पाटील यांनी केले.

 

यावेळी बोलताना, प्रताप शेळके म्हणाले की, वातावरणामुळे गायींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. एकदा ती बसल्यावर तिला उचलण्यासाठी खूप अडचणी यायच्या. यापार्श्वभूमीवर काऊ लिफ्टिंग मशिन अतिशय फायदेशीर ठरणार्‍या आहेत. जनावरांच्या बाजारात शेतकर्‍यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होते. ती टाळण्यासाठीही सोनोग्राफी मशिन बसविण्याचे धोरण जिल्हा परिषद राबविणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post