नगर, (दि.01 डिसेंबर) : कल्याण रोड परिसर हा नगर शहराच्या जवळचा भाग असून या भागात दिवसेंदिवस नागरी वसाहती वाढत आहेत. मात्र, या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून आजवर अनेक आंदोलने करूनही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.
त्यामुळे कल्याण रोड परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी लिंक रोड परिसरातील जगताप मळा व पावन म्हसोबानगर किंवा हॅपी थॉट येथे पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या उभारण्यात याव्यात, तसेच शिवाजीनगर येथील नवीन पाण्याच्या टाकीजवळ पंप उभारण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक सचिन शिंदे यांनी स्थायी समिती सभापती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या भागातील रहिवासी मनपाची वर्षभराची संपूर्ण पाणीपट्टी भरतात मात्र, त्यांना केवळ ४५ दिवस व तोही अपुरा पाणीपुरवठा होतो.
Tags:
Ahmednagar
