अंगावर घाण पडल्याचे सांगत ; 95 हजाराची पिशवी लांबवली

नगर, (दि.26 डिसेंबर) : अंगावर घाण पडल्याचे सांगत चोरट्याने गाडीच्या हॅण्डलला लावलेल्या पिशवीतील रोख 95 हजार रुपये बेलवंडी येथून लंपास केले. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

येळपणे येथील तात्या किसन गावडे यांचे सोसायटीकडून मंजूर झालेले 95 हजाराचे पीक कर्ज बेलवंडी येथील सहकारी बँकेत जाऊन काढून घेत पिशवीत ठेवले. रकमेची पिशवी गाडीच्या हॅण्डलला लावली असता गावडे यांना अज्ञात चोरट्याने तुमच्या कपड्यावर घाण पडली आहे असे सांगितले.

घाण स्वच्छ करण्यास गावडे जवळील हॉटेलमध्ये गेले असता हॅण्डलची 95 हजार रुपये रकमेची पिशवी त्या चोरट्याने लंपास करत चोरटा फरार झाला. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार मधुकर सुरवसे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post