10 डिसेंबरपासून महानगरपालिका कर्मचार्‍यांचे बेमुदत धरणे आंदोलन


नगर, (दि.04 डिसेंबर) : महापालिका कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बैठक बोलावून चर्चा करण्याची मागणी कामगार युनियनने केली होती. तथापि, मनपाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने १० डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला.

 

मनपा कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा फरक एक रकमी अदा करणे, भविष्य निर्वाह निधीची इतरत्र खर्च केलेली रक्कम पुन्हा वर्ग करणे, यासह १७ मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्यांबाबत यापूर्वीच आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. 

 

या निविदेनाद्वारे मागण्यांबाबत तातडीने बैठक लावण्याचेही कळवले होते. तथापि, दखल घेतली जात नसल्याने धरणे आंदोलन पुकारण्याची भूमिका घेतल्याचे लोखंडे यांनी सांगितले. आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर लोखंडे यांच्यासह सरचिटणीस आनंद वायकर यांचीही स्वाक्षरी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post