नगर,(दि.08 नोव्हेंबर) : दुकानात येत गुटखा आहे का? अशी विचारणा करत चोरट्याने दुकानाच्या काऊं टरबर ठेवलेली सोन्याची चेन लांबविली. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता सावेडीत घडली.
महिलेने यासंदर्भात तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या महिलेने त्यांच्या दुकानाच्या काऊं टरवर गळ्यातील सोन्याची चेन ठेवली होती. त्याचवेळी दुकानात ’एक अनोळखी इसम आला. त्याने गुटखा आहे का? असे विचारले.
त्यावर महिलेने गुरखा नाही, असे सांगितले. त्यानंतर या इसमाने शाम्पूची पुडी विकत घेतली व तो दुकानातून निघून गेला. त्यानंतर महिलेने दुकानाच्या काऊंटरवर ठेवलेली चेन पाहिली असता, त्यांना ती दिसली नाही. शाम्पूची पुडी विकत घेण्यासाठी आलेल्या इसमाने 67 हजार 500 रूपये किंमतीची सोन्याची चेन चोरून नेली.
