नगर,(दि.07 नोव्हेंबर) : कर्जतमध्ये दुकान बंद करून घराकडे निघालेल्या सराफांना रस्त्यात अडवून लुटणार्या टोळीतील 6 जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकारणात एक सराफ असून त्यानेच हा प्रकार घडवुन आणला असल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. यातील उर्वरीत मुद्देमाल व आरोपी अटक होतील असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला.
या आरोपींकडे 113 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 5 लाख 76 हजार रुपयांचा, तर 17.13 किलो वजनाची चांदी किंमत अंदाजे 8 लाख 5 हजार 690 रुपये दागिने जप्त करून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती सुझुकी कंपनीची सेलोरीटो चारचाकी वाहन किंमत अंदाजे 3 लाख रुपये जप्त करण्यात आली आहे. तसेच बजाज कंपनीची पल्सर दुचाकी किंमत 50 हजार रुपये, हिरो होंडा कंपनी स्प्लेंडर 40 हजार रुपये असे एकूण 18 लाख 16 हजार 690 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
