मुंबई, (दि.08 नोव्हेंबर) : राजस्थान सरकारने फटाक्यांवर बंदी घातली यानंतर अशी बंदी महाराष्ट्रातही घालण्याची मागणी युवा काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडून पर्यायवरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
ते म्हणाले की, 'दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तेथील राज्य सरकाराने फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाक्यांमुळे आवाज, हवा यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना माझी विनंती आहे की, आपल्या राज्यातही जास्त धूर सोडणारे आणि मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर कायमची बंदी आणावी.
या व्यावसायात मोठ्या प्रमाणावर व्यापारीवर्ग अवलंबून आहे. तरीही पुढच्या सात पिढ्यांचा विचार करून आता थोडे नुकसान झाले तरी चालेल. मात्र, येणाऱ्या पिढ्यांसाठी फटाक्यांवर बंदी आलीच पाहिजे' असे तांबे म्हणाले आहेत.
