पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग पाचव्या दिवशी वाढ

 

नवीदिल्ली, (दि.25 नोव्हेंबर) : सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. आज दिल्लीत पेट्रोल 6 पैसे प्रतिलिटर महागले आहे. दिल्लीत पेट्रोलची नवीन किंमत प्रतिलिटर 81.59 रुपये करण्यात आली आहे. सर्वसामान्याचं कंबरडे मोडलेले असल्याने यातच आता दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.

 

कोरोनाच्या काळात वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात 16 पैसे प्रतिलिटर वाढ करण्याची घोषणा केली आहे.


दिल्लीत आता डिझेलची किंमत प्रतिलिटर 71.41 रुपये करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढत असल्यानं वाहन चालकांना त्याचा मोठा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. कोरोनाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर दुचाकी आणि वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

 

दररोज 6 वाजता बदलतात दर : दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

Post a Comment

Previous Post Next Post