रक्तदानाने घर घर लंगर सेवेच्या जेवण वाटपाचा समारोप

युनानी, आयुर्वेदिक काढा वाटप व कोविड सेंटर राहणार सुरु


तर या दिवाळीत गरजूंना फराळ वाटपाचा उपक्रम

 


नगर, (दि.11 नोव्हेंबर) : मागील साडे सात महिन्यांपासून शहरात सुरु असलेली घर घर लंगर सेवेच्या वतीने गरजूंना जेवण पुरविण्यात आले. ही लंगर सेवा रविवार (दि.8  नोव्हेंबर) पासून समारोप करण्यात आला असून, या लंगरसेवेचा समारोप रक्तदान शिबीराने झाला. तर लंगरसेवेच्या वतीने नागरिकांसाठी सकाळी युनानी व आयुर्वेदिक काढा वाटपचा उपक्रम व गुरु अर्जुनदेव कोवीड केअर सेंटर नगरकरांच्या सेवेत सुरूच राहणार असल्याची माहिती हरजितसिंग वधवा यांनी दिली.


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनकल्याण रक्तपिढीत रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवहानाला प्रतिसाद देत रक्तदान शिबीर घेण्यात आले. लंगरसेवेच्या सेवादारांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. यावेळी श्रीरामपूरचे पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, दामोदर माखीजा, प्रशांत मुनोत, किशोर मुनोत, नरेंद्र बोठे, सुनील थोरात, डॉ. गुलशन गुप्ता, अ‍ॅड.चंद्रकांत पाटील, अनिश आहुजा आदी उपस्थित होते.


दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वसामान्य व गरजू घटकातील नागरिकांची दिवाळी गोड होण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने फराळाचे पॅकेट वाटप केले जाणार आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने सर्वांची दिवाळी गोड होण्यासाठी फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी दानशूर व्यक्तींनी व सामाजिक संस्थांनी लंगर सेवेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post