काँग्रेसने क्रीडा समिती स्थापन करावी

नगर, (दि.09 नोव्हेंबर) : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात क्रीडा संघटना आहेत, चांगले खेळाडू आहेत.संघटना व खेळाडूंना योग्य सहकार्य व मार्गदर्शन वेळेवर न मिळाल्यामुळे ते क्रीडा क्षेत्रापासुन दुरावत चालले आहेत. अशा क्रीडा संघटना व खेळाडुंना योग्य मार्गदर्शन व शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी इतर पक्षा प्रमाणे कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून क्रीडा समिती स्थापन करावी. 

 

त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील अनेक संघटना, खेळाडू , क्रीडा प्रेमी व पालक वर्ग प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या पक्षात जोडला जाईल असे निवेदन मावळचे काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते पै. चंद्रकांत सातकर, राष्ट्रीय खेळाडू व पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस शाम भोसले यांनी दिले. यावेळी पै. संभाजी राक्षे, विशाल तरस, राजू ठोकळे व के. पी. अडम आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post