सीताफळांवर चोरट्यांनी मारला डल्ला

75 हजार रुपयांची 1 हजार 100 किलो सीताफळे चोरीला
 


नगर, (दि.09 नोव्हेंबर) : शहरासह जिल्हयात चोर्‍यांचे प्रमाण वाढत असतानाच आता चोरट्यांनी आपले लक्ष शेतकर्‍यांच्या मालवर केंद्रीत केले असल्याचे चित्र आहे. वडनेर हवेली मधील शेतकर्‍याच्या शेतामधील सीताफळांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

शेतातील कांदे, डाळिंब, कलिंगडांची चोरी झाल्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहेत. मात्र, आता चोरट्यानी सीताफळांवरही डल्ला मारला आहे. वडनेर हवेली येथील शेतकरी आबासाहेब वाळुंज यांच्या शेतातून 74 हजार 500 रुपये किमतीची सुमारे एक टन सीताफळ चोरट्यांनी लंपास केले आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

वाळूंज कुटुंब शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पादने घेते. त्यांनी गोल्डन जातीच्या संकरित सीताफळांची लागवड केली आहे. झाडांना लगडलेली सीताफळे परिपक्व झाल्यानंतर त्यांच्या विक्रीची वेळ आलेली असताच त्यावर चोरांची वक्रदृष्टी पडली.

त्यांनी 74 हजार 750 रूपये किमतीची तब्बल 1 हजार 100 किलो सीताफळे चोरून नेली. वाळुंज यांनी सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु  आहे.

Post a Comment

Previous Post Next Post