कर्डिले यांच्यान नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. येत्या आठ दिवसांत आरोपींना अटक न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्यामार्फत हा विषय उपस्थित केला जाईल, असेही ते म्हणाले.
बनावट डिझेल प्रकरण होऊन 15 दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापपर्यंत या रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आलेली नाही. यापूर्वीचा नाफ्ता भेसळ प्रकरणाचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील बनावट डिझेल व नाफ्ता भेसळीचे मोठे रॅकेट आहे.
त्याला राजकीय वरदहस्त असल्याने खुलेआम विक्री केली जात आहे. राजकीय दबावापोटी कारवाई उशीर होत आहे. राजकीय दबावाला बळी न पडता बनावट डिझेल व नाफ्ता भेसळीचा योग्य व नि:पक्ष तपास करून मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी, अशी मागणी कर्डिले यांनी केली आहे.
