भिंगारात घराचे कुलुप तोडून रोख रक्कम चोरीला


नगर, (दि.12 नोव्हेंबर) : भिंगारमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील 18 हजार रूपये रोख चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि.7) दुपारी 3.30 ते रविवारी (दि.8) सकाळी 8 च्या दरम्यान घडली.


वडारवाडी, भिंगार येथील ग्रामपंचायत कार्यालयामागे, सुवर्णदीप रोहौसिंग येथे राहणारे आनंद सुरेंद्र जोशी हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असतांना हा प्रकार घडला. 



या प्रकरणी जोशी यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post