लोणी, (दि.14 नोव्हेंबर) : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा आंबिया बहार २०१९ - २० मध्ये जिल्ह्यातील ८३०१ शेतकऱ्यांना फळबागेचा ३४ कोटी ९२ लाख ९१ हजार रूपयांचा विमाही मंजूर झाला असल्याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
हवामानावर आधारीत पंतप्रधान फळपीक विमा योजनेत जिल्ह्य़ातील द्राक्ष, डाळींब, संत्रा, मोसंबी, केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेवून आपले प्रस्ताव सादर केले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणा-या नूकसानीत मदतीचे पाठबळ शेतकऱ्याना मिळावे म्हणून हवामानावर आधारीत पीक विमा योजनेची सुरूवात करण्यात आली. जिल्ह्य़ात सन २०१९-२०२० या वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या फळबागाना या विमा योजनेचे संरक्षण कवच मिळाले असल्याचे खा.डॉ विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील २९७ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याना ७ कोटी ३० लाख ६ हजार, ६८५ डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना ३४ कोटी ८७ लाख, ६५ आंबा उत्पादकांना २ लाख ९० हजार, ११०७ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना १ कोटी १० लाख, १३० मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना ४ लाख ४५ हजार,७७ केळी उत्पादक शेतकऱ्यांना १४ लाख ७० हजार रूपयांचा विमा मंजूर झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुकानिहाय विचार केल्यास अकोले तालुक्यातील २६३ शेतक-यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. त्यांना ९२ लाख २१ हजार रूपये मंजूर झाले. जामखेड तालुक्यातील ८२ शेतकऱ्यानी या योजनेत आपले प्रस्ताव सादर केले होते त्यांना ४ लाख ८६ हजार तर कर्जत तालुक्यातील ३६७ शेतकऱ्यांना २ कोटी ७ लाख, कोपरगाव तालुक्यातील ३२३ शेतकऱ्याना १ कोटी १३ लाख, नगर तालुका २५८ शेतकऱ्याना १ कोटी २४ लाख, नेवासा ३३० शेतकऱ्याना २ कोटी २८ लाख, पारनेर ४५० शेतकऱ्याना २ कोटी २२ लाख,
पाथर्डी तालुक्यातील २ हजार शेतकऱ्याना ७ कोटी ४९ लाख, राहाता तालुक्यातील ४९६ शेतकऱ्यांना २ कोटी ४१ लाख, राहुरी तालुक्यात २९४ शेतकऱ्यांना १ कोटी ६० लाख, संगमनेर तालुक्यातील १ हजार ५०९ शेतकऱ्यांना ६कोटी ३३ लाख, शेवगाव तालुक्यातील ३३३ शेतकऱ्यांना १कोटी ५० लाख, श्रीगोंदा तालुक्यातील १ हजार ४३९ शेतकऱ्यांना ६ कोटी ४४ लाख आणि श्रीरामपूर तालुक्यातील १४६ शेतकऱ्यांना ७५ लाख रुपयांच्या विमा रक्कमेस मंजूरी मिळाल्याने अडचणीत असलेल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे खा.डॉ.विखे म्हणाले.
